बॅ. नाथ पै यांचं २०२१-२०२२ हे जन्मशताब्दी वर्षं. ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ संस्थेच्यावतीनं हे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांचं आयोजन करून साजरं करण्यात आलं. त्याबद्दल थोडक्यात-
‘बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण’च्या वतीनं आयोजित करण्यात आलेले उपक्रम
२५ सप्टेंबर २०२१
– बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीचा शुभारंभ दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आला.
त्यावेळी साथी प्रा. आनंद मेणसे यांच्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन व साथी प्रा. आनंद मेणसे यांचे ‘बॅ. नाथ पै – व्यक्ती व विचार’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
तसेच ऑनलाइन स्पर्धेतील १०० गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
– वराडकर हायस्कूल कट्टा, सौ. हि. भा. वरसकर विद्यालय चौके, न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर या हायस्कूलामध्ये नाथ पै यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली.
७ ऑक्टोबर २०२१
– फक्त महिलांसाठी खुली दशावतारी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
जानेवारी २०२२
– बॅ. नाथ पै जीवन दर्शन परीक्षा
– बॅ. नाथ पै यांच्या जीवनावर आधारित २०० प्रश्नोत्तरांची पुस्तिका त्यावर आधारित प्रश्नमंच स्पर्धा
सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे वितरीत शिक्षक भरतीचे सहकार्य
१५ एप्रिल २०२२
– बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा
विषय –
१) आधुनिक भारताचे शिल्पकार – बॅ. नाथ पै
२) लोकशाही भंगारात निघू नये म्हणून
३) खरा धर्म, धर्माच्या पलीकडचा
४) ट्रोल होणं मानवी आहे, ट्रोल करणं नाही
प्रथम क्रमांक – रु. १५,००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – रु. १३,००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – रु. ११,००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
चतुर्थ क्रमांक – रु. १०,००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
पाचवा क्रमांक – रु. ७००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ – रु. २००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र (पाच क्रमांक)
३० एप्रिल ते ३ मे २०२२
– वारकरी कीर्तन – प्रवचन प्रशिक्षण शिबीर
महाराष्ट्रातील ५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग – ५ दिवस
५ मे २०२२
दशावतारी नाट्यमहोत्सव (५ दिवस)
६ जून २०२२
शिवराज्याभिषेक दिन साजरा
शिवाजी कोण होता? या पुस्तकातील निवडक उताऱ्याचे अभिवाचन करून याच पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
२४ जुलै २०२२
– मोफत बुद्धिबळ प्रशिक्षण
– इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती वर्गाचे उद्घाटन
प्रवेश परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश
दर शनिवारी-रविवारी व सुट्टीच्या दिवशी मार्गदर्शन
हा वर्ग परीक्षेपर्यंत सुरू राहणार आहे.
यासाठी मनाली वेंगुर्लेकर (बीएसस्सी) ही मुख्य मार्गदर्शक म्हणून काम करते.
१५ ऑगस्ट २०२२
– १२५ गरजूंना प्रत्येकी १००० रु. च्या जीवनाश्यक वस्तूंचे वितरण
२६ ऑगस्ट २०२२
– मोदक प्रशिक्षण शिबीर
११ सप्टेंबर २०२२
– डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या कवितासंग्रहाचे जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकाचे रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन
सहभाग
सुमती लांडे, संध्या नरे-पवार, डॉ. महेश केळुसकर
१२ सप्टेंबर २०२२
आस्थेचे प्रश्न
वर्तमान राजकीय, सामाजिक आणि साहित्य-संस्कृती विषयी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवाद
संवादक
डॉ. महेश केळुसकर
संध्या नरे-पवार
सुमती लांडे
अॅड. देवदत्त परुळेकर
ऑनलाईन
‘बॅ. नाथ पै सेवांगण’ संस्थेच्या वतीनं २५ सप्टेंबर २०२१ ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात घेण्यात आलेले ऑनलाइन कार्यक्रम
२ ऑक्टोबर २०२१
– बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त शुभारंभ स्पर्धा
– ‘महात्मा गांधीचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य व कार्य’ एक स्पर्धा…
११ ऑक्टोबर २०२१
– जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा
अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश! जयप्रकाश !!
२० ऑक्टोबर २०२१
संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धा
‘संत तुकडोजी महाराज-समाजप्रबोधक व्यक्तिमत्त्व’ एक स्पर्धा
१२ नोव्हेंबर २०२१
– प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा
प्रा. मधु दंडवते गांधीवादी विचारवंत
५ डिसेंबर २०२१
‘कवी मनाचा साहित्यिक वसंत बापट’ एक स्पर्धा
२६ डिसेंबर २०२१
‘ग. प्र. प्रधान- सुसंस्कृत राजकारणी’ एक स्पर्धा.
९ जानेवारी २०२२
‘यदुनाथ थत्ते कणखर चारित्र्यवान संपादक’ एक स्पर्धा.
२३ जानेवारी २०२२
थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांची ५१ वी पुण्यतिथी आणि प्रा. मधु दंडवते यांची ९८ व्या जयंतीनिमित्त
‘चाचणी सामन्य ज्ञानाची’ एक स्पर्धा.
कट्टा शाखेनं राबवलेले उपक्रम
२ ऑक्टोबर २०२१
– महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती
५० विद्यार्थ्यांना शिक्षण निधी वितरण
सन्मानीय श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
१२ नोव्हेंबर २०२१
– प्रा. मधु दंडवते स्मृतिदिन
माता यशोदाचे संचालक श्रीकृष्ण हरचांदे यांच्या उपस्थितीत सेवानिधीचे वितरण व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या आकाश कंदिल आणि भेटकार्ड तसेच रानभाजी स्पर्धेचे बक्षीस वितरण
१४ नोव्हेंबर २०२१
– पंडित नेहरू जन्मदिन साजरा
सन्माननीय श्रीकृष्ण हरचांदे यांच्या उपस्थितीत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
१६ डिसेंबर २०२१
– ‘पुस्तकाने मला काय दिले?’
५ विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकावर आपले मनोगत व्यक्त केले.
रोटरी क्लब मुंबई-माहीमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
२२ डिसेंबर २०२१
– बापूभाई शिरोडकर स्मृतिदिन
– अंगणवाडीतील मुलांच्या स्पर्धा-गोष्ट सांगणे, अभिनय गीत
२७ डिसेंबर २०२१
– इ. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालस्पर्धा महोत्सव संपन्न.
यामध्ये १७ प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये ९०० विद्यार्थ्यांचा सहभाग
१९ फेब्रुवारी २०२२
– शिवजयंती उत्सव
बॅ. नाथ पै पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या विविध बालस्पर्धांचा बक्षीस समारंभ व शिवजयंती उत्सव श्री. भास्कर आकेरकर, माजी मुख्यध्यापक, वराडकर हाय. कट्टा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
२८ फेब्रुवारी २०२२
– मराठी भाषा गौरव दिन
– राष्ट्रीय विज्ञान दिन
केंद्रशाळा कट्टा येथे श्री. रमेश म्हाडगुत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
६ मार्च २०२२
– मा. ॲड. देवदत्त परुळेकर व श्री. रामचंद्र आंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत
– ‘बापूभाई शिरोडकर स्मृती अष्टावधानी गुरू पुरस्कार’ मा. सुरेश ठाकूर यांना प्रदान
– सौ. वैशाली वासुदेव माडये स्मृती सभागृह येथे गानकोकिळा लता मंगेशकर, रमेश देव आणि सुधीर कलिंगण यांना गायनातून श्रद्धांजली अर्पण.
१४ एप्रिल २०२२
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम समता नगर नांदोस येथे संपन्न झाले.
४ मे २०२२
– चित्रकला छंद शिबिर
प्रसिद्ध चित्रकार विनायक गोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ दिवसांचे चित्रकला छंद शिबिर आयोजित केले. यामध्ये १०० विद्यार्थ्यांचा सहभाग
११ जून २०२२
– साने गुरुजी स्मृतिदिन
शिक्षण निधी वितरण
‘श्री. य. वा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार’ श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांना प्रदान करण्यात आला.
२६ जून २०२२
– गुणवंतांचा सत्कार
इ. १० वी व इ. १२ वीतील गुणवंतांचा सत्कार
मुख्याध्यापकांचा सत्कार
श्री. संजय नाईक, वराडकर हायस्कूल, कट्टा
श्री. तुकाराम पेडणेकर, शिवाजी विद्यामंदिर, काळसे
श्री. विजय गांवकर, भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके
१० जुलै २०२२
– आषाढी एकादशीनिमित्त अभंग गायन स्पर्धा
२३ जुलै २०२२
– शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ
१५ ऑगस्ट २०२२
– दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त
– १२५ गरजूंना प्रत्येकी १००० रु. जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
– गुणवंतांचा सत्कार
– ७५ स्केचचे प्रदर्शन