लोकशाहीचा कैवारी

तळकोकणातल्या जनतेच्या जिवीचा जिव्हाळा, भारतीय राजकारणावर घट्ट ठसा उमटवणारे संसदपटू, तेजस्वी वक्ते, संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करणारे समाजवादी विचारवंत, भारतीय लोकशाहीचा पाया रचणारे एक आदर्श लोकप्रतिनिधी, कोकणच्या विकासाचे संकल्पक आणि चोखंदळ रसिकाग्रणी बॅ. नाथ पै यांच्या कर्तृत्वाचा परिचय.

अधिक वाचा..

आम्ही चालवू हा पुढे वारसा

कोकणच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात गेल्या चार दशकांहून अधिक काळ महत्त्वाचं योगदान देणारी संस्था म्हणजे ‘बॅ. नाथ पै सेवांगण’. मालवणच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी उभ्या असलेल्या या संस्थेने निरंतर लोकसेवेतून बॅ. नाथ पै यांच्या समाजवादी विचारांचा वारसा निष्ठेनं पुढं चालवला आहे. लोकांच्या बदलणाऱ्या गरजा ओळखून काळाला आणि नव्या माध्यमांना अनुरूप उपक्रम राबवून ‘सेवांगण’नं नवी ओळख निर्माण केलीय.

अधिक वाचा..

साने गुरुजी वाचन मंदिर

सेवांगणच्या मालवण व कट्टा या दोन्ही ठिकाणी वाचनालय आहे. मालवण येथे १८ हजार, तर कट्टा शाखेत १२ हजार पुस्तके आहेत. या दोन्ही वाचनालयांमार्फत वाचनविषयक विविध उपक्रम राबवले जातात. सेवांगणतर्फे दरवर्षी ८० गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. प्रा. मधु दंडवते सेवानिधीमार्फत उच्चशिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.

मधुबन

दिवंगत समाजवादी नेते मधू दंडवते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'बॅ. नाथ पै सेवांगण' संस्थेनं 'मधुबन' या विश्रामगृहाची निर्मिती केली. समाजासाठी राबणाऱ्या आणि विधायक कार्य करणाऱ्या मंडळींनी एकत्र यावं, आपापसांत चर्चा-विनिमय-संवाद करावा आणि भविष्याच्या कार्याची दिशा ठरवावी यासाठी एकत्र येण्याचं हे हक्काचं ठिकाण बनलं आहे. 'मधुबन'च्या प्रांगणात विविध संस्थांच्या वतीनं शिबिरं, चर्चासत्र, कार्यशाळा यांचं आयोजन केलं जातं. समोरच असलेला समुद्रकिनारा, शांत-रम्य वातावरण यामुळं 'मधुबन' हे ठिकाण अल्पावधीतच कार्यकर्ते आणि अभ्यासकांच्या आवडीचं ठिकाण बनलं आहे. अत्यंत माफक शुल्कात निवास आणि भोजनाची सोय संस्थेच्या वतीनं करून देण्यात येते.

बातम्या आणि मीडिया